जळगाव प्रतिनिधी जळगावात नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून भाडेकरूंमध्ये हाणामारी झाली. त्याचा राग मनात ठेवून दोन बहिणींचा विनयभंग केल्याची प्रकार घडला आहे. याबाबत शनीपेठ्यातील पोलीस ठाण्यात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात दोन बहिणी ह्या भाड्याच्या घरात राहून जीवन जगत होते. त्यांच्या घराच्या शेजारी मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी हे दाम्पत्य राहते. गुरूवार २८ जुलै रोजी सायंकाळी घरात पाणी भरण्याच्या कारणांमुळे दाम्पत्या बरोबर वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यातील मनोज कोळी याने दोन्ही बहिणींशी धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला.
याबाबत रात्रीच्या वेळी दोन्ही बहिणींनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात मनिषा मनोज कोळी आणि मनोज कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.