अर्जुन खोतकर या दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश , पहा माहिती
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी
अब्दुर सत्तार यांच्या उपस्थित भेट घेतली. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आले.अर्जुन खोतकर हे आपण शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे म्हटले होते. यावर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे.
खोतकर यांनी EDची नोटीस आल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदल्याची चर्चा आहे. ईडीची कारवाई वाचविण्यासाठी खोतकर हे आता शिंदे गटात सामील होणार आहे . राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा आता नेम नाही. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे आता एकत्र येताना दिसले आहे. भाजपचे नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यसोबत ब्रेकफास्ट घेतला.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची जवळपास एक तास बैठक झाली. येत्या 31 जुलैला अर्जुन खोतकर सिल्लोडमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाल्यानंतर ही बैठक पार पडली. शिंदे गाटाच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सहभागी होत आहेत. काही माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटात जात आहेत. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे.