Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अंत्यसंस्कारवेळी उडाला भडका , दोन मृत्यू तर एक जखमी
    Uncategorized

    अंत्यसंस्कारवेळी उडाला भडका , दोन मृत्यू तर एक जखमी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपुरात खळबळ उडाली आहे. एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारावेळी अग्नी देताना आगीचा भडका उडाला. यावेळी तिथे असलेले तीन जण जखमी झाले. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

    गुरुवारी सायंकाळी नागपूर कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे स्थानिक रहिवासी सिद्धार्थ हुमणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेले असता त्यावेळी अग्नी देताना हा प्रकार घडला. आगीत तीन जण गंभीर होरपळले. अग्नी देण्यासाठी डिझेलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे डिझेलचा भडका उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहेत.

    यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघेजण गंभीररित्या भाजले होते. गंभीर रित्या जखमी झालेल्या तिघांनाही उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या घटनेनंतर कामठी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नवीन कामठी पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.

     

    #accident #nagpour #updatesnews #topnews
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.