जळगाव प्रतिनिधी सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात मतिमंद तरुणीला ओळखीच्या व्यक्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची पित्तखवळणारी घटना घडली आहे. यात एकास अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्याला 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला.
सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात संबंधित मतिमंद तरुणी राहण्यास आहे. मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. 25 जुलै दुपारच्या सुमारास घडली. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज ऊर्फ अहमद शेख हा घरी येत असे मतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.सोमवारी दुपारी नराधम हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला सोबत घेऊन खाऊ आणतो असे सांगितले. अजिज उर्फ अहमद गुलामदस्तगीर शेख वय 45 रा. साईनगर असे त्यांचे नाव आहे. त्या व्यक्तीला आजीने नकार दिला असतानाही तो जबरदस्ती घेऊन गेला त्यानंतर दीड तासाने मुलीला घरी प्यायली. तेव्हा पीडित मुलीने रडत रडत घडलेली प्रकार आजीस सांगतिला. रात्री कामावरून घरी परतलेल्या पीडितेच्या वडिलांना घडला प्रकार समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजिज ऊर्फ अहमद शेख याला अटक करून पोलिस कोठडी घेतली. सहायक निरीक्षक कुकडे पुढील तपास करीत आहेत.