जळगाव प्रतिनिधी भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारतासाठी आज कौतुकास्पद दिवस आहे. सध्या जागतिक कॅडेट्स कुस्ती चॅम्पियनशिप 2022 ही एकत्रित स्पर्धांची जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धा सुरु आहे. दिनांक 25 ते 31 जुलै या कालावधीत रोम, इटली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फारिम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. 2022 वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये ग्रीको-रोमन (GR) 55kg स्पर्धेत सूरजने सुवर्णपदक जिंकले आहे. या प्रकारात यापूर्वी कुस्तीपटू पप्पू यादव यांनी 32 वर्षांपूर्वी देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. अशाप्रकारे तो गेल्या 32 वर्षात भारताचा पहिला GR अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. भारताचा पप्पू यादव 1990 मध्ये शेवटचा अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियन होता. सुरच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.