Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अट्टल दुचाकी चोरट्यांला धुळ्यातून अटक; चोरीच्या २७ दुचाकी केल्या हस्तगत
    क्राईम

    अट्टल दुचाकी चोरट्यांला धुळ्यातून अटक; चोरीच्या २७ दुचाकी केल्या हस्तगत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २७ जुलै रेाजी दुपारी धुळे शहरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हा दाखल आहेत.

    योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर, पारोळा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार केले. यात पोहेकॉ संदीप पाटील, पो.ना. प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोहेकॉ विजय चौधरी यांना गुन्ह्यातील आरोपींच्या शोधकामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बुधवारी २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धुळ्यातून संशय आरोपी योगेश शिवाजी दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पारोळा शहरातून चोरून नेली दुचाकीचा गुन्हा कबूल केला आहे. यापूर्वी देखील पारोळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संशयिताने दुचाकी चोरी केली होती. या गुन्ह्यात तो फरार होता. त्याचप्रमाणे त्याच्यावर जळगाव शहर, पारोळा, अमळनेरसह धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल २७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला पारोळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.