जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16 हजारांहून रूग्ण समोर आली आहेत. इतर देशासह मंकीपॉक्सचा भारतातही प्रसार होत आहे. अलीकडे, केरळमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर, दिल्लीतील एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भारतात मंकीपॉक्सची प्रकरणे येऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिला आहे. मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करून, ने सर्व देशांना गंभीर होण्याचे आवाहन केले आहे.ताप आणि अंगात फोड आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत सरकारने मंकीपॉक्सबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे.
तीव्र ताप, थकवा, कंप सुटणे आणि अंगभर जखमा अशा लक्षणांसह थियागो स्थानिक हॉस्पिटमध्ये दाखल झाले होते. पण गुतांगाच्या आजूबाजूच्या भागातील पुरळ, जखमा, सूज आणि जळजळ ही त्यांची मुख्य तक्रार होती. संसर्गग्रस्त व्यक्तीचे कपडे, अंथरूण-पांघरूण किंवा टॉवेल वापरणे, त्याच्या जखमांना स्पर्श करणे या गोष्टींमुळेही इतरांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. माकड, उंदीर किंवा खार यांच्यासारख्या प्राण्यांपासून मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.