लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रेल्वे स्थानकाजवळील जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून ३ तीन हजार व तक्रारदाराचे काम करून २ दोन हजार मागितले होते, मात्र आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.