धरणगांव : प्रतिनिधी
शहरातील एका नामांकि शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या एका उपशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेच्या वेळेबाहेर नियमबाह्य स्वरूपाची कामे केल्याचे उघड झाल्यानंतर संस्थेने तातडीने हा कठोर निर्णय घेतला.
सदर शिक्षकाच्या कृती संस्थेच्या नियमांशी विसंगत असल्याचे समोर आले असून, त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन होण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर बाबीची दखल घेत संस्थेच्या प्रशासनाने विलंब न करता कारवाई केली.
संस्थेच्या चेअरमन व सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, संस्थेची किंवा समाजाची बदनामी होईल असे कोणतेही कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीस, तिचा प्रभाव किंवा पद काहीही असो, अशा प्रकरणांमध्ये पाठिशी घातले जाणार नाही. संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि समाजात योग्य संदेश देण्यासाठी संबंधित शिक्षकास निलंबित करण्यात आल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.



