जळगाव : प्रतिनिधी
गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन विक्रांत वासुदेव राणे (वय २०, रा. समर्थनगर खेडी, ता. जळगाव) या तरुणाला दोघांनी लोखंडी कड्यासह स्टिलच्या ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता खेडी गावात घडली. यप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी गावात विक्रांत राणे हा वास्तव्यास असून तो शिक्षण करतो. दि. ६ एप्रिल रोजी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन संशयित जितू पाटील व निखील पाटील यांनी विक्रांतला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर स्टिलच्या कड्यासह ब्लेडने त्याच्यावर वार करीत गंभीर जखमी केले. जखमी विक्रांतला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याने उपचार घेतल्यानंतर दि. ७ रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेका दीपक महाजन हे करीत आहे.



