जळगाव : प्रतिनिधी
घरमालकाच्या घरातून ६२ हजार रुपये किमतीच्या चिलर मशीन व पाच मोटारी चोरून नेणाऱ्या नासीर निसार शेख (रा. शाहूनगर) व कार्तिक संजय मोरे (रा. नवीपेठ) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. तिसरा साथीदार मात्र पसार आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजमालती नगरातील रहिवासी संजू बिसमिल्ला पटेल (वय ४९) यांनी त्यांच्या घरातील एक खोली नासीर शेख निसार याला भाडेतत्त्वावर दिली होती. १ एप्रिल रोजी ते भाडे घेण्याकरिता गेले असता मशिनरी व इतर साहित्य तेथे नव्हते. पटेल यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.
ही चोरी नासीर शेख, कार्तिक मोरे व त्यांच्या अन्य एका साथीदाराने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, दीपक शिरसाठ, योगेश पाटील, नंदलाल पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार, राहुल पांचाळ यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने नासीर शेख याला पाळधी येथून तर कार्तिक मोरे याला राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. दोघांकडून चोरीच्या चिलर मशिन व दोन मोटारी जप्त केल्या



