पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील धूळपिंप्री येथे ५३ वर्षीय शेतकरी शेतात पाणी भरण्यास गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीजवळ पाय घसरून ते विहिरीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील धूळपिंप्री येथील तथा माजी सरपंच शेतकरी सतीश आत्माराम पाटील (वय ५३) हे नेहमीप्रमाणे ५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. ते सकाळपर्यंत घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे शेतात जावून नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. तर शेतातील विहिरीत मृत अवस्थेत ते आढळून आलेत. दरम्यान, पाय घसरुन ते विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत सतीश पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.



