Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसीतील कंपनीतून ईलक्ट्रीक सामानांची चोरी
    क्राईम

    एमआयडीसीतील कंपनीतून ईलक्ट्रीक सामानांची चोरी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात असलेल्या गीता इंडस्ट्रीज कंपनीतून इलेक्ट्रिक सर्व्हिस वायरचे बंडल आणि अल्युमिनियम कॉईल असा एकूण ५९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सेक्टर मधील ३२ मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याचे काम होते. दरम्यान १९ जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून ५९ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मालक राहुल प्रताप गुरुनानी रा. गायत्री नगर, शिरसोली रोड जळगाव यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.