Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारामतीत बिनविरोधची अपेक्षा, पण लढत अटळ; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
    राजकारण

    बारामतीत बिनविरोधची अपेक्षा, पण लढत अटळ; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

    editor deskBy editor deskApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बारामती  : वृत्तसंस्था 

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक टळू शकली नाही.

    या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्टरीत्या केले,” असे शिंदे म्हणाले. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निर्णयातही अजित पवारांचा मोठा वाटा होता, असे त्यांनी नमूद केले.

    यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचाही गौरव केला. “अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्या सक्षमपणे प्रयत्न करत आहेत. महायुतीतील सर्व नेते एकत्रितपणे राज्याचा कारभार पुढे नेत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

    बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवार यांना चांगली जाण असून, स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध सामाजिक संघटनांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला असल्याचे त्यांनी नमूद केले.

    शिंदे पुढे म्हणाले की, “ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र आता निवडणूक होत असल्यास जनतेचा कौलच अंतिम ठरेल. विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

    शेवटी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देताना शिंदे म्हणाले की, “जर निवडणूक झालीच, तर अजित पवारांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील. आणि त्यातून सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या फरकाने होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात ही लढत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नांदेड हादरले : शिवसेना पदाधिकाऱ्याची भररस्त्यात तलवारीने हत्या; तीन दिवसांत पाच खून !

    April 6, 2026

    59 वर्षांची राजकीय परंपरा कायम; शरद पवारांनी घेतली राज्यसभेची शपथ, पवार घराण्याचा ऐतिहासिक क्षण

    April 6, 2026

    गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला; ७० गावांचा पाणीप्रश्न गंभीर, आंदोलनाचा इशारा !

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.