जळगाव : प्रतिनिधी
मध्यरात्रीच्या सुमारास अंधारात झाडाच्या आडोशाला संशयास्पदरित्या उभ्या फैजान आरिफ खान पठाण (वय २०, रा. मच्छीबाजार तांबापुरा) व अनसार शहा रुबाब शहा (वय १९, रा. बिलाल चौक तांबापुरा) यांच्यावर जिल्हापेठ पोलिसांनी दि. ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गोविंद साबळे, कैलास शिंदे हे दि. ४ रोजी नाईट राऊंड ड्युटीवर होते. यावेळी त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास शासकीय आयटीआयच्या मागील बाजूस एमएसईबी सबस्टेशनजवळ दोन इसम अंधाराचा फायदा घेवून झाडाच्या आडोशाला उभे दिसले. पोलिसांना बघताच ते पळून जात असतांना पोलिसांनी पाठलाग करीत त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी फैजान आरिफ खान पठाण व अनसार शहा रुबाब शहा असे नाव सांगितले. दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



