Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव कारची दुचाकीला धडक; चालक फरार, दुचाकीस्वार गंभीर जखमी !
    क्राईम

    भरधाव कारची दुचाकीला धडक; चालक फरार, दुचाकीस्वार गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskApril 6, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील खडका चौफुली परिसरात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील सतिष प्रकाश धनगर (वय ३८) हे १ एप्रिल रोजी आपल्या मित्र आकाश माळी यांच्या दुचाकीवरून अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास खडका चौफुली येथील पूजा कॉम्प्लेक्सजवळ हा अपघात झाला.

    मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९ ईए २४९९) धनगर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत धनगर हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, गालावर, हात, पाठ आणि गुडघ्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

    अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दीपक काटकर आणि इतरांनी तातडीने मदत करत जखमी धनगर यांना रुग्णवाहिकेद्वारे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कार चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात धनगर यांचा मोबाईल फोनही हरवला आहे.  या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भोंदू अशोक खरात प्रकरणात निनावी पत्र; रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !

    April 6, 2026

    लग्न’ की फसवणूक? अडीच लाख घेऊन नवरीचा पळ, दुसऱ्यासोबत विवाह

    April 6, 2026

    अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, अत्याचाराचा गुन्हा !

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.