जळगाव ;- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी किशोर लोखंडे (वय २२) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
वैष्णवी लोखंडे ही समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे राहत होती. वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत. मृत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.