Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला; आरोपी ताब्यात !
    क्राईम

    भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला; आरोपी ताब्यात !

    editor deskBy editor deskApril 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने फक्त दोन दिवसांत 5,70,000 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रुपये चोरलेल्या आरोपीला ताब्यात घेतला आहे.

    दिनांक 30 मार्च 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला वसीम अहमद अब्दुल बासीद शेख रा. फातेमा कॉलनी, भुसावळ यांनी घरफोडीची तक्रार केली. त्यांची फिर्याद अशी होती की, 28 ते 30 मार्च दरम्यान ते घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घर फोडून 5,70,000 रुपये किमतीचा सोन्याचांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली.

    पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने त्वरित कारवाई करत आरोपीचा शोध घेतला.
    गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी अमीर खान हबीब खान (वय 35, रा. न्युईदगा जवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने या घरफोडीमध्ये एका विधी संघर्ष बालकाशी सहकार्य केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4,99,100 रुपये किमतीचा चोरी केलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

    सदर आरोपीला न्यायालयाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला असून, पुढील तपास उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक राजु सांगळे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुषमा अंधारेची प्रकृती बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

    April 8, 2026

    बारामतीत ‘वनसाईड’ची हवा फुस्स : ५५ उमेदवारांनी लढत रंगली; सुनेत्रा पवारांसमोर नवे आव्हान !

    April 8, 2026

    धूळपिंप्रीत हृदयद्रावक घटना; शेतात गेलेले माजी सरपंच विहिरीत मृत अवस्थेत

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.