Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ६ मिनिटांत एटीएम गायब : जळगावात चोरट्यांचा सिनेस्टाईल दरोडा, ९.५ लाख लंपास !
    क्राईम

    ६ मिनिटांत एटीएम गायब : जळगावात चोरट्यांचा सिनेस्टाईल दरोडा, ९.५ लाख लंपास !

    editor deskBy editor deskApril 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलनपेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्री अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ उडाली आहे. ‘एक्विटास स्मॉल फायनान्स बँके’च्या एटीएम केंद्रावर टाकण्यात आलेल्या या दरोड्यात सुमारे ७ लाख रुपयांची रोकड आणि मशीनसह एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहन चोरले आणि त्यानंतर पोलनपेठेतील सत्यम प्लाझामधील एटीएम केंद्र गाठले.

    सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक संशयित तोंडाला रुमाल बांधून एटीएम केंद्रात शिरला. त्याने अत्यंत सराईतपणे एटीएम मशीनला जाड दोरखंड बांधला. हा दोर बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला जोडण्यात आला. त्यानंतर वाहनाच्या सहाय्याने जोरात हिसका दिला असता एटीएम मशीन जमिनीवरून उखडले गेले. मशीन खाली पडताच बाहेर दबा धरून बसलेले इतर तीन साथीदार आत शिरले. अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजे १.३१ वाजेपर्यंत त्यांनी जड एटीएम मशीन वाहनात टाकले आणि भुसावळच्या दिशेने पलायन केले. ही संपूर्ण कारवाई इतक्या वेगाने पार पडली की परिसरात कोणालाही याची चाहूल लागली नाही.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. काही वेळातच कंडारीजवळील मन्यारखेडा शिवारात चोरलेले मालवाहू वाहन आणि फोडलेल्या अवस्थेत एटीएम मशीन सापडले. मात्र, चोरट्यांनी मशीनमधील सुमारे ७ लाख रुपयांची रोकड काढून घेतली होती. बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी एटीएममध्ये १० लाख रुपये भरण्यात आले होते. चोरीच्या वेळी सुमारे ७ लाख रुपये शिल्लक होते. तसेच एटीएम मशीनचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, एकूण ९.५ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

    या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांकडून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बुरखा घालून ज्वेलरी दुकानात दरोडा; ‘खेळण्याच्या पिस्तुलाने’ 3.6 लाखांचे सोनं लंपास : प्रेमीयुगुल अटकेत

    April 3, 2026

    क्लबमध्ये गोळीबार आणि तलवारीसह हल्ला, चार ते पाच जखमी!

    April 3, 2026

    धक्कादायक खुलासा : उपमुख्यमंत्री शिंदेंनी खरातला केले तब्बल १७ वेळा फोन !

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.