Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक खुलासा : उपमुख्यमंत्री शिंदेंनी खरातला केले तब्बल १७ वेळा फोन !
    क्राईम

    धक्कादायक खुलासा : उपमुख्यमंत्री शिंदेंनी खरातला केले तब्बल १७ वेळा फोन !

    editor deskBy editor deskApril 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय मंडळींच्या अशोक खरातशी झालेल्या फोन व्यवहाराचा धक्कादायक खुलासा केला आहे. दमानियाने सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातशी तब्बल 17 वेळा फोनवर संवाद साधला आहे. त्यापैकी 10 कॉल्स इनकमिंग आणि 7 कॉल्स आऊटगोईंग होते, तर एकदा दोघांमध्ये तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले.

    त्याचबरोबर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातला तब्बल 177 कॉल्स केले आहेत. त्यांच्या भगिनी तृप्ती चाकणकर यांनीही 236 कॉल्स केले होते, तर माजी मंत्री दीपक केसरकरांचे विश्वासू दीपक लोंढे यांनी 189 कॉल्स केले आणि 30,579 सेकंदाचे संभाषण साधले.

    दमानिया यांनी सांगितले की, या सर्व कॉल्स साधे फोन कॉल्स आहेत, व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमांवरील कॉल्स यामध्ये मोजता येत नाहीत. शिवाय, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स, तर आशिष शेलार यांचा 1 कॉल देखील खरातला झाला.

    सीडीआर विश्लेषणानुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 33,727 सेकंदांचे मोठे संभाषण झाले आहे, जे दमानियाने खूप धक्कादायक मानले. त्यांनी म्हटले की, “एवढा वेळ कुणीही आपला गुरुशी बोलू शकत नाही, त्यामुळे यावर त्वरित चौकशी करणे गरजेचे आहे.”

    सामाजिक कार्यकर्त्या दमानियाने या सर्व माहितीची कॉपी पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री तसेच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांना दिली असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामागे त्यांचा कुठलाही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू नाही, तर फक्त जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती शेअर केली आहे.

    दमानियाचे म्हणणे आहे की, अशोक खरातला देश-विदेशातून कॉल्स येत होत्या – कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड यांसह विविध ठिकाणांहून. त्यामुळे त्यांनी एसआयटीला संपूर्ण चौकशी करावी, असा आग्रह केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण : पत्नी कल्पना खरात फरार, SITच्या तपासात धक्कादायक खुलासे

    April 3, 2026

    क्लबमध्ये गोळीबार आणि तलवारीसह हल्ला, चार ते पाच जखमी!

    April 3, 2026

    वाळू डंपरचा मृत्यूचा वेग ; १९ वर्षीय विद्यार्थीनी ठार, मैत्रीण गंभीर !

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.