चोपडा ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल
चोपडा-प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० जूलै रोजी रात्री ९ वाजता मुलगी घरी असतांना राहूल अशोक सोनवणे रा. धुळे याने तिला काहीतरी सांगून फूस लावून पळवून नेले. त्यानंतर मुलगी मध्यरात्री दीड वाजता घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. पिडीत मुलीच्या आईने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.