Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विश्वासाचा गैरफायदा : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीरावर फसवणुकीचा गुन्हा
    क्राईम

    विश्वासाचा गैरफायदा : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीरावर फसवणुकीचा गुन्हा

    editor deskBy editor deskApril 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दीर्घकाळाच्या ओळखीचा आणि एकाच गावचा असल्याचा गैरफायदा घेत एका कारागिराने सुवर्ण व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक अडचणीचे कारण सांगून घेतलेले २९६ ग्रॅम सोने परत न करता तब्बल ९ लाख ३३ हजार २०८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सोनू डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी ओमप्रकाश सोनी (वय ४९, रा. रोहित अपार्टमेंट, भिकमचंद जैननगर) यांचे बालाजी पेठेत ‘ओम ज्वेलर्स’ नावाचे सराफा दुकान आहे. आरोपी सोनू वैष्णव (रा. लक्ष्मीनगर, जळगाव) हा त्यांचा समव्यावसायिक असून दोघांमध्ये मागील २०-२५ वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. विशेष म्हणजे, दोघेही राजस्थानमधील एकाच गावाजवळील असल्याने त्यांच्यात विश्वासाचे नाते होते.

    माहितीनुसार, २०१७-१८ दरम्यान सोनू वैष्णव याने आर्थिक अडचण असल्याचे सांगत सोनी यांच्याकडे मदत मागितली होती. त्यावेळी सोनी यांनी विश्वासाने त्याला २४ कॅरेटचे २९६ ग्रॅम सोने दिले. पुढे ९ मे २०२५ रोजी हे सोने परत करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देत नोटरीद्वारे करार करण्यात आला होता.

    मात्र, ठरलेली मुदत संपल्यानंतरही आरोपीने सोने परत केले नाही. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सोनी यांनी सोन्याची मागणी केली असता, सुरुवातीला ‘व्यवसायात तोटा झाला आहे, काही दिवस थांबा’ असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. त्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली.

    दरम्यान, ९ जानेवारी २०२६ रोजी सोनी आपल्या मित्रांसह आरोपीच्या रथ चौक येथील दुकानावर गेले असता, सोनू वैष्णव याने सोने देण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर ‘जे होईल ते करून घ्या’ अशी धमकी देत त्याने जबाबदारी झटकली. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनी यांनी १ एप्रिल रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोनू डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

    या प्रकरणामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, विश्वासाच्या नात्यातून झालेल्या या फसवणुकीची चर्चा शहरात सुरू आहे. शनिपेठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळू डंपरचा मृत्यूचा वेग ; १९ वर्षीय विद्यार्थीनी ठार, मैत्रीण गंभीर !

    April 3, 2026

    इच्छादेवी परिसरात आगीचा कहर; क्षणात तीन घरांचे संसार राख

    April 3, 2026

    रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.