लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गावाकडे तलाठ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असतात तर चक्क गुरुवारी रात्री रावेर शहरातील स्टेशन जळगावात दारु पिऊन अंडी विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा करताना एक व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. परंतु या प्रकरणाचा कोणतीही गुन्हा दाखल झाला नाही.
जळगाव तालुक्यातील एका गावातील तलाठ्याने अंडा पाव विक्री करणार्या विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा घालताना. चक्क विक्रेत्याशी डोके लावले व अंडी विक्रेत्याला कारवाईची धमकी देखील दिली. मात्र विक्रेत्याने देखील पोलिसाची धमकी दिली. तळीराम तलाठ्याच्या इतर सहकार्याने वाद मिटवला. दोघांनी धूम ठोकली असली तरी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. धिंगाणा घालणार्या तलाठ्याकडे महसूल प्रशासनाचा छुपा असलेला आशीर्वाद यामुळे कारवाई होत नसल्याने छुपा गौण खनिज वाहतुकीला ऊत आला आहे.