Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री बेधडक गोळीबार; नागरिकांत भीतीचे वातावरण !
    क्राईम

    मध्यरात्री बेधडक गोळीबार; नागरिकांत भीतीचे वातावरण !

    editor deskBy editor deskMarch 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरला. चिराग हॉलच्या मागील सत्य साईनगर भागात शुक्रवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेधडक फायरिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या शांततेत अचानक घुमलेल्या गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

    प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, काही क्षणांसाठी परिसरात अक्षरशः धावपळ उडाली. अनेकांनी घरांचे दरवाजे बंद करून सुरक्षिततेचा आश्रय घेतला, तर काहींनी तात्काळ पोलिसांना कळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी अशा प्रकारच्या धाडसी गोळीबारामुळे शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय जाधव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत तपास सुरू केला असून, गोळीबार झालेल्या ठिकाणाहून गोळ्यांचे अवशेष, रिकामे खोके आणि इतर पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार वैयक्तिक वाद, टोळी संघर्ष की अन्य कोणत्या कारणातून घडला, याचा तपास सरू आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

    March 29, 2026

    गॅस टंचाईचा बळी : रांगेत उभ्या असताना ७० वर्षीय माजी सरपंचाचा मृत्यू

    March 29, 2026

    मुलीनेच वडिलांचा घेतला जीव! मिल्कशेकमध्ये विष देऊन पोलिस अधिकाऱ्याची हत्या

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.