लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील रायसोनी नगरात राहणाऱ्या विवाहितेला हुंड्याच्या पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवारी २२ जुलै रोजी दुपारी पतीसह इतरांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रायसोनी नगर येथे माहेर असलेल्या कृतिका गिरीश गायकवाड (वय-२६) यांचा विवाह अहमदनगर येथील गिरीश प्रफुल्ल गायकवाड यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती गिरीश गायकवाड यांनी हुंड्याच्या पैशांची मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिला शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून सासरे, सासू, ननंद, नंदोई यांनी गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथे निघून आल्या. शुक्रवारी २२ जुलै रोजी त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती गिरीश प्रफुल्ल गायकवाड, सासरे प्रफुल्ल बाळकृष्ण गायकवाड, सासू मनीषा प्रफुल्ल गायकवाड, नणंद प्राजक्ता किरण जाधव, नंदोई किरण राम जाधव सर्व रा. गुगुडे ट्रेडिंग जवळ, अहमदनगर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.