लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:दिपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंच्या टीकांना उत्तरं दिली. शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी संघर्ष केला, कट्टर शिवसैनिकांची बदनामी केली जातेय, दीपक केसरकर यांनी आपल्या गटाची बाजू मांडली. शिवसैनिकांचा अपमान करू नका, ज्यांचा आदर केला त्यांच्याविरोधात बोलायची वेळ आणू नका,” असा सल्ला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
केसरकर पुढे म्हणाले, “संजय राठोडांचा विवाह असताना ते शिवसेनेसाठी तुरुंगात गेले होते. अनेकवेळा तुरुंगात गेले याला शिवसेना म्हणतात. या सगळ्यांमुळे सेना ताठ उभी आहे. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रिपदाचं वचन दिलं होतं. त्यांना मिळालं नाही तरी शिंदेसाहेब गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांनी पद देऊ करुनही त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशी आघाडी तोडण्यासाठी विनंती केली,” असं केसरकर म्हणाले.
आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत, आम्हाला अपात्र ठरवण्यासाठी का प्रयत्न केले जात आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार असाल तर त्याला शिवसेना कसं म्हणता येईल.”उद्धव ठाकरे आजारातून बरे झाल्यावर शिंदे त्यांना भेटले आणि राष्ट्रवादीशी संबंध तोडण्यास सांगितले. ते आजारी असताना बंड झालं हे खोटं आहे. आज कार्यकर्ते लांब जातील असे वाटत असल्यामुळे यात्रा सुरू आहेत,” असंही केसरकर म्हणाले.