जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता नुकताच खोटे नगर परिसरात एका बंद घराचा कडीकोंडा तोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खोटे नगर बस स्टॉप जवळील जय हिंद कॉलनी येथील रहिवासी क्षितीज देविदास सुरडकर (वय 30) हे खाजगी व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद घर बघून दरवाज्याचा कडी कोंडा तोडून घरातून 200 ग्रॅम वजनाची चांदीची प्लेट वाटी, चमचा, ग्लास इन्व्हर्टरची बॅटरी, एलसीडी टीव्ही, तीन पितळाचे पातेले व एक पितळी समई असा ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिनांक 27 मार्च रोजी जळगाव तालुका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील हे करीत आहे



