स्वस्त धान्य दुकानदारांना दिले प्रशिक्षण
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तहसिल कार्यालय धरणगाव येथे हर घर झेंडा अभियानाबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली.
या सभेत सर्व शासकीय यंत्रणांनी ऑगस्ट १३ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा अभियानात आपला सहभाग नोंदवून सदर अभियानास तालुक्यात जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी दिल्या.या सोबतच पावर पॉईंट द्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले.दुकानदार या अभियानात गावागावात नागरिकांना झेंडा विक्री करणार असल्याची माहिती देवरे यांनी दिली.
याप्रसंगी स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ही तहसीलदार देवरे यांनी सर्व उपस्थितांना दिले.
तालुक्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांची साथ आवश्यक असल्याचे आवाहन तहसिलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांनी केले आहे.
चौकट:
तालुका मुख्यालयी उभारणार 75 फुटी झेंडा याबाबत सा बां विभाग,न प विभागाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करण्याचे निर्देश तहसिलदार यांनी संबंधीतास दिले*