Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस निरीक्षक महेश शर्मा नियंत्रण कक्षात बदली
    क्राईम

    पोलीस निरीक्षक महेश शर्मा नियंत्रण कक्षात बदली

    editor deskBy editor deskMarch 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    सततच्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत भडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक शर्मा यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः दाखल गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींना अटक करण्यात झालेली दिरंगाई, तसेच पोलिस ठाण्यातील लूज सुपरविजन याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करत त्यांची तत्काळ बदली करण्यात आली.

    यापूर्वीही निरीक्षक महेश शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी असताना पाणीपुरवठा पाइप चोरी प्रकरणात त्यांच्याविरोधात विधानसभेत तक्रार झाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई त्यांच्या कारकिर्दीतील दुसरी मोठी प्रशासकीय कारवाई ठरली आहे.

    दरम्यान, भडगाव येथे दोन दिवसांपूर्वी एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणात एका दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. पोलिस ठाण्याच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर बसस्थानक परिसरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर निरीक्षक शर्मा यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती.

    मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणाशी या बदलीचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, वाढत्या तक्रारी आणि कामकाजातील त्रुटींमुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून निष्काळजीपणावर कठोर भूमिका घेतली जात असल्याचा संदेशही यातून देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    केंद्राचा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटीत मोठी कपात !

    March 27, 2026

    मी कुणावरही जबरदस्ती केली नाही ; अशोक खरातचा खुलासा !

    March 27, 2026

    रामजन्मोत्सवात भक्तीचा जल्लोष; ‘महाबली मारुती’ ठरला शोभायात्रेचा केंद्रबिंदू

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.