Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !
    क्राईम

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    editor deskBy editor deskMarch 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एका तृतीयपंथी व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावा संबंधित व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असून, तो मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आणि मंत्री एकत्र दिसत असून, परिसरात दारू व खाद्यपदार्थ असल्याचेही सांगितले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    या प्रकरणानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेला महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचे उदाहरण म्हटले आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी नैतिकतेची किमान मर्यादा पाळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, संबंधित तृतीयपंथी पवन यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. याआधीही झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्या वेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

    व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि झिरवाळ यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026

    ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.