Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू
    क्राईम

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    कंपनीत जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन श्रीकांत सुरेश पवार (२८, रा. कुहे पानाचे, ता. भुसावळ) या कामगाराचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला मित्र आणि दुसऱ्या दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात २४ मार्च रोजी रात्री चिंचोली गावाजवळ झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे येथील श्रीकांत पवार हे एका पाइप कंपनीत कामाला होते. २४ मार्च रोजी ते मित्राला सोबत घेऊन कंपनीत जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्रीकांत पवार यांना मयत घोषित केले. श्रीकांत यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच, कुटुंबीय व ग्रामस्थ रुग्णालयात पोहोचले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. या अपघाताने चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरा

    April 11, 2026

    सुनेत्रा पवारांनी सावध राहावे; राजकारणात धोके संभवतात – संजय शिरसाट !

    April 11, 2026

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू..

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.