Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कंपनीत जात असतांना दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात श्रीकांत सुरेश पवार (वय २८, रा. कुऱ्हपानाचे, ता. भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत आणि धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचोली आणि उमाळा गावादरम्यान असलेल्या टेकडीजवळ घडली. जखमींवर खासगी रुगलयात उपचार सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हपानाचे गावात राहणारा श्रीकांत पवार हा तरुण उमाळा येथील एका पाईप कंपनीत कामाला होता. मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी तो मित्राला सोबत घेवून कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाला. कंपनीत जात असतांना चिंचोली ते उमाळा गावाच्या मध्ये असलेल्या टेकडीजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला.

    दुचाकीस्वारांचा अपघातात ते गंभीर जखमी झाल्याचे समजाच नागरिकांनी तात्काळ जखमींना वाहनात टाकून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत श्रीकांत पवार याला मयत घोषीत केले. तर अन्य जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कामावर जाणाऱ्या श्रीकांत यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी श्रीकांत यांचा मृतदेह बघताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. श्रीकांत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. चिमुकल्य मुलीच्या डोक्यावरील पितृछ हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक् केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.