लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सर्वेाच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण बहाल करतानाच 15 दिवसांच्या आत निवडणूक जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसेच जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरु झाली होती.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने या प्रक्रियांवर स्थगिती आली होती. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेत, आरक्षणासह निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्ह्यात या पार्श्वभूमिवर निवडणुकांबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वार्ड रचना, मतदार यादी यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच मतदान केंद्रेदेखील निश्चित करण्यात आलेली आहेत.
राज्य निवडणुक आयोगाकडून आता, नव्याने कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निवडणुका केव्हाही लागू द्या, जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगरपालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका केव्हाही लागू द्या जिल्हा प्रशासन संपुर्ण प्रक्रियेसाठी तयार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.