Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैशांच्या वादातून मित्राचा खून; रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव उघड !
    क्राईम

    पैशांच्या वादातून मित्राचा खून; रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव उघड !

    editor deskBy editor deskMarch 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    बांभोरी येथील रेल्वे पुलाखाली राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये पैशांच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्राचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पाळधी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी गावाजवळील रेल्वे पुलाखाली पिंटू बारेला, त्याची पत्नी सखूबाई बारेला, सुनील बारेला (सर्व रा. वरला, जि. बडवानी) तसेच कैलास बारेला (रा. पांढरी, ता. चोपडा) हे सर्वजण रेल्वे लाईन परिसरात पडलेल्या बाटल्या व इतर साहित्य गोळा करून उदरनिर्वाह करीत होते. ते पुलाखाली झोपडी करून वास्तव्यास होते. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास काही पैसे मिळाल्यानंतर सर्वांनी दारू सेवन केली. त्यानंतर जेवण करत असताना सुनील बारेला याने पिंटू बारेला याच्यावर “तू माझे पैसे व मोबाईल घेतले” असा आरोप करत वाद घातला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

    संतापलेल्या सुनील बारेला याने काठी व दगडांनी पिंटू याला बेदम मारहाण केली. या वेळी पिंटूची पत्नी सखूबाई ही मध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. जखमी झाल्याने ती तेथून निघून गेली. त्यानंतर सुनील याने पिंटू याच्यावर चाकूने वार केल्याने तो निपचित पडला. मित्राचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने सुनील बारेला याने पिंटूचा मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकला व अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पाळधी रेल्वे स्थानकावर दिली. तेथून ही माहिती पाळधी पोलिसांना कळविण्यात आली.

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सखूबाई बारेला यांनी मृतदेहाची ओळख पटवून सुनील बारेला याने खून केल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

    याप्रकरणी सखूबाई बारेला यांच्या फिर्यादीवरून पाळधी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांचे पथक करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026

    किरकोळ कारणावरून संताप; आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर निर्घृण हल्ला !

    March 24, 2026

    जेलमधून बाहेर येताच दहशत : ‘जळगावचे डॉन’ म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.