Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जेलमधून बाहेर येताच दहशत : ‘जळगावचे डॉन’ म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड
    क्राईम

    जेलमधून बाहेर येताच दहशत : ‘जळगावचे डॉन’ म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड

    editor deskBy editor deskMarch 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आम्हीच जळगावचे डॉन… आत्ताच जेलमधून बाहेर आले असून कोणी पुढे आले तर मुडदे पाडू असे म्हणत चार ते पाच जणांच्या टोळके हातात कोयते घेवून अरुणाबाई करतार पवार (वय ५०, रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा, ता. जळगाव) यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. ही घटना दि. २१ रोजी दुपारी ४ वाजता कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगरात अरुणाबाई पवार या वास्तव्यास आहे. दि. २१ मार्च रोजी जून्या भांडणाच्या कारणावरुन चार ते पाच जणांच्या टोळके हातात कोयत्या सारखे हत्यार घेवून पवार यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आरडाओरड करीत योगेश कुठे आहे त्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हणून त्यांनी कोयत्याने घरातील भांड्याची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच आम्ही जळगावचे डॉन आहोत, आत्ताच जेलमधून बाहेर आलो आहे कोणी पुढे आले तर एक-एकाचे मुडदे पाडू अशी धमकी दिली. याप्रकरणी अरुणाबाई पवार यांनी दि. २२ रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार चार ते पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राहूल तायडे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026

    पैशांच्या वादातून मित्राचा खून; रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव उघड !

    March 24, 2026

    किरकोळ कारणावरून संताप; आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर निर्घृण हल्ला !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.