जळगाव : प्रतिनिधी
भांडण पाहण्यासाठी थांबल्याचा राग आल्याने वसीम शेख शब्बीर शेख (वय ३७, रा. बिलाल चौक, तांबापुरा) या तरुणाला चापटा बुक्क्यांसह हातातील कडे मारुन जखमी केले. ही घटना दि. २२ मार्च रोजी मेहरुण परिसरातील घरकुल घरांसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मेहरुण परिसरातून वसीम शेख शब्बीर शेख हे जात असतांना रस्त्यामध्ये प्रकाश उर्फ दादू दगडू कालपे, धनराज भिका हटकर यांच्यात वाद सुरु होते. त्यांच्यातील वाद पाहत असल्याचा दोघांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करीत वसीम शेख याला मारहाण केली. यावेळी धनराज हटकर याने त्याच्या हातातील लोखंडी कडे वसीम शेख याच्या गालाला मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



