लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. विधानसभेतील आमदारांनी शिवसेनेपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर किमान १२ खासदारांनीही संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे. लोकसभाध्यक्षांनी त्याला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यताही दिली आहे. धनुष्य बाण हे चिन्ह पक्षप्रमुख अध्दव ठाकरे यांच्याकडे रहाणार का, याकडेही लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी उध्दव ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे.
शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पडद्यामागे प्रचंड प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील २८२ पैकी १८८ सदस्य आमच्याकडे असल्याचा दावा केला. तसे घडल्यास संपूर्ण शिवसेना पक्षच ठाकरे कुटुंबीयांच्या निसटण्याची दाट शक्यता आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार
आहेत. उर्वरित पाच जागांवरील सदस्यांची निवड पक्षप्रमुख करतात. दर पाच वर्षांनी हे सदस्य निवडले जातात. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. सध्याच्या घडीला राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे.
शिंदेंच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ व रामदास कदम यांची हकालपट्टी केली होती. तर सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले आहेत. यात कोणतेही बदल करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असतील तर शिवसेना पक्षप्रमुखांचा कौल हा अंतिम असतो.