लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आक्रमक चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेचा एक व्हिडिओ पोस्ट करत खोचकपणे डिवचले आहे. यावर नाना पटोलीनी आता प्रतिउत्तर दिले आहे.
तो भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघांनी ट्विट केलेला व्हिडिओ, व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हेच असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसाच टीशर्ट घातलेली एक व्यक्ती एका तरूणीसोबत हॉटेलमध्ये बसलेली दिसतेय. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे. नानांचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला, त्यानंतर आपण ट्विट केला, असा दावा चित्रा वाघ यांनी केलाय.
व्हिडिओबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. मात्र, नाना पटोले यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर नाना मात्र पुरते खवळले होते. व्यक्तिगत बदनामी करण्याचं हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप नानांनी केलाय. आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय. ”मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, पण राजकारणाची पातळी जी खाली उतरलीय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटल. चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना मला त्या ताईंबद्दल काहीही बोलायचं नाही, संजय राठोडांबाबत त्यांनी काय केलं. आमच्या प्रकरणात काय घडलंय ते आमची लीगल टीम पाहातेय.