Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !
    क्राईम

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    editor deskBy editor deskMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात त्याचे विकृत स्वरूप, महिलांचे लैंगिक शोषण, व्हिडीओ पुरावे आणि त्याच्या नावावर असलेली बेनाम संपत्ती समोर आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.

    पत्रकारांशी संवाद साधताना कालीचरण महाराज म्हणाले की, धर्माच्या नावावर पैसे घेणे चुकीचे नाही, परंतु लोकांना ठगणे किंवा कूकर्म करणे हा गुन्हा आहे. “जो लोक कूकर्म करतो, तो नरकात जाईल आणि शासकीय दंडही मिळेल,” असे ते म्हणाले.

    महाराज पुढे म्हणाले, “स्वयंघोषित महाराज किंवा साधू जर दुरुपयोग करत आहेत, कूकर्म करीत आहेत किंवा धर्म कलंकित करीत आहेत, तर हे लोक महापापी आहेत. जेव्हा त्यांच्या गुन्ह्यांची सिद्धता होते, तेव्हा त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे.”

    कालीचरण महाराजांनी असेही स्पष्ट केले की, राजांनाही अशा साधूंवर विश्वास ठेवण्याची इच्छा असते कारण त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय असतो आणि त्यांच्या शिष्य मतदानात प्रभाव टाकतात. मात्र, जर साधू भ्रष्ट निघाला, तर राजाही त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही.

    महाराजांच्या विधानामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळांतून मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अशा विधानांनी लोकांमध्ये न्याय आणि कडक कारवाईबाबत चर्चा तिव्र केली आहे, तसेच धर्माच्या नावावर होणाऱ्या दुरुपयोगावरही लक्ष वेधले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत

    March 22, 2026

    चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!

    March 22, 2026

    दारूच्या नशेत वाद : मोठ्या भावानेच लहान भावाला दगडाने ठेचून मारले!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.