Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत
    क्राईम

    भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत

    editor deskBy editor deskMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटना उघडकीस आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्यात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!

    March 22, 2026

    दारूच्या नशेत वाद : मोठ्या भावानेच लहान भावाला दगडाने ठेचून मारले!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.