Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!
    क्राईम

    चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!

    editor deskBy editor deskMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    तालुक्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १३ किलो २५४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला यांच्या शेताजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. या वेळी इम्रान रहेमान पठाण (वय २१), रहेमान निहामत पठाण (वय ५९) आणि अतिक रफिक शेख (वय ४५) हे तिघे गांजाची तस्करी करताना पोलिसांच्या तावडीत सापडले. तिन्ही आरोपी हे परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

    झडतीदरम्यान आरोपींकडून १३ किलो २५४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ९१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी घेतलेली ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत

    March 22, 2026

    दारूच्या नशेत वाद : मोठ्या भावानेच लहान भावाला दगडाने ठेचून मारले!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.