Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय
    राजकारण

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    editor deskBy editor deskMarch 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र रंगून गेला. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. नववर्षाच्या स्वागतासाठी घराघरांत गुढी उभारण्यात आल्या असून नव्या संकल्पांसह वर्षाची सुरुवात करण्यात आली.

    नागपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असल्याचे सांगत त्यांनी नव्या वर्षात सकारात्मक संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या नागरिकांमुळे नागपूर शहर भगवामय झाले होते.

    दरम्यान, ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. कोपीनेश्वर मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसेच खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर रंगलेली ही शोभायात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

    डोंबिवली येथे गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत आधुनिकतेची झलक पाहायला मिळाली. महिला रायडर्स आणि सायकलस्वारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत मोटरसायकलवर गुढी उभारून अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. नव्या पिढीकडून परंपरेचे जतन करण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हा यंदाच्या उत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरला.

    दरम्यान, तुळजा भवानी मंदिर येथे गुढीपाडवा भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे आरती करून मंदिराच्या शिखरावर विधीवत गुढी उभारण्यात आली. मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा आणि वाकोाजी बुवा यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा करण्यात आली. तसेच विठ्ठल रुखमिनी मंदिर  येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. एकूणच, परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम अनुभवत राज्यभर गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    . नाशिक हादरले : ५८ व्हिडिओंसह तथाकथित गुरूचा काळा कारनामा उघड !

    March 19, 2026

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.