जळगाव : प्रतिनिधी
पोलिस दलाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात अटकेत असलेल्या व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ यांच्या पोलीस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक म्हणून नियुक्त असलेल्या उपनिरीक्षक वाल्मिक वाघ याने १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक वाल्मीक वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ या दोघांना अटक करण्यात आले आहे. वाघ यांच्याघराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. त्या दोघ पिता-पुत्रांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.



