Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्टॅम्पवर काळाबाजार : ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी ५००ची लाच घेताना दोघे रंगेहाथ जाळ्यात !
    क्राईम

    स्टॅम्पवर काळाबाजार : ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी ५००ची लाच घेताना दोघे रंगेहाथ जाळ्यात !

    editor deskBy editor deskMarch 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    पाच हजारांच्या स्टॅम्प घेण्यासाठी अतिरीक्त पाचशे रुपयांची लाच घेतांना स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) व झेरॉक्स दुकानदार प्रशांत ईश्वरलाल संघवी (दोघ रा. विवेकानंद नगरी, पाचोरा) यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दि. १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तक्रारदार हे दि. १५ रोजी पाचोरा शहरातील भडगारस्त्यावर असलेल्या प्रशांत झेरॉक्स दुकानात पाचशे रुपयांचे दहा स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. त्यांना स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी एका स्टॅम्पची किंमत ५५० रुपये सांगितली. तसेच तक्रारदार यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना आधारकार्ड घेवून या तेव्हाच तुम्हाला स्टॅम्प मिळतील असे सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

    मंगळवारी तक्रारदार हे वेंडर संघवी यांच्याकडे स्टॅम्प घेण्यासाठी गेले. स्टॅम्प वेंडर यांनी पाच हजारांच्या स्टॅम्पचे साडेपाच हजार रुपये घेवून पाचशे रुपयांची लाच स्विकारली. इशारा मिळताच सापळा रचून बसलेल्या पथकाने पाच स्विकारतांना स्टॅम्प वेंडर योगेश संघवी व झेरॉक्स दुकानदार प्रशांत संघवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘तू मला खुन्नस का दिली?’ म्हणत एकाला बेदम मारहाण !

    March 18, 2026

    ‘गुड बाय’ स्टोरीनंतर धरणगांवच्या विद्यार्थ्याचा जळगावात अंत !

    March 18, 2026

    पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.