Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शॉर्टसर्किटने गव्हाच्या शेताला आग; ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला
    क्राईम

    शॉर्टसर्किटने गव्हाच्या शेताला आग; ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला

    editor deskBy editor deskMarch 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या शेताला शॉर्ट सर्किटने आग लागून गहू अन् ठिबक नळ्या आदी जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात रोहित्र असून या रोहित्रात पक्षी शिरल्याने शॉर्टसर्किट झाले अन् त्याची ठिणगी उभ्या गव्हाच्या पिकावर पडल्याने आग लागली. काही वेळातच संपूर्ण शेतात आग पसरली. तर, अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी ग्रामस्थांनी पालिकेला कळवले. परंतु, पालिकेने आधी पोलिसांत तक्रार करा, असे सांगितले. तोपर्यंत शेतात आग वाढत गेली.

    दरम्यान, गावातील श्याम पाटील, भीमराव पाटील सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह गावातील शेतकरी व तरुणांनी आजूबाजूच्या शेतातल्या ओल्या मक्याची व बाजरीची तोटे घेऊन आग विझवणे सुरू केले. बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. तोपर्यंत दिनेश पाटील यांनी पो.नि. दत्तात्रय निकम यांना ही कळवल्यानंतर अग्निशमन बंब उशिरापर्यंत पोहोचला. मात्र, शेतातले तापमान आणि ठिणग्या शिल्लक राहू नयेत, म्हणून अग्निशमन दलाने पाणी मारून शेत ओले केले, त्यामुळे धोका टळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हे. कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिंदेंचा दिल्लीत ‘पॉवर मूव्ह’; महायुतीत जागावाटपावर खलबतं

    March 17, 2026

    चाळीसगाव हादरले! शेडमध्ये सुटली गोळी, रिक्षाचालक गंभीर जखमी

    March 17, 2026

    आश्रम शाळेच्या मागील बाजूस आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.