Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवार प्रकरणावर नवा संशय; भास्कर जाधवांची सखोल चौकशीची मागणी
    राजकारण

    अजित पवार प्रकरणावर नवा संशय; भास्कर जाधवांची सखोल चौकशीची मागणी

    editor deskBy editor deskMarch 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :  वृत्तसंस्था

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 15 जानेवारीपर्यंत अजित पवारांनी केलेली विधाने आणि त्यानंतर त्यांना अप्रत्यक्षपणे दिले गेलेले इशारे पाहता 28 जानेवारीला झालेला विमान अपघात हा केवळ योगायोग आहे की त्यामागे षडयंत्र आहे, याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

    28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदारांनी हा केवळ अपघात नसून संभाव्य घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणावर विधिमंडळात चर्चा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र ही चर्चा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने प्रश्न अधिकच गडद होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

    भास्कर जाधव म्हणाले की, “अजित पवारांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. देशातील आणि राज्यातील अनेकांनी ही घटना पाहिल्यानंतर ती साधा अपघात नसावा, अशी भावना व्यक्त केली होती आणि आजही ती कायम आहे.”

    भास्कर जाधव यांनी अजित पवारांच्या काही विधानांचा उल्लेख करत या संशयाला अधिक बळ मिळत असल्याचे म्हटले. पिंपरी चिंचवड येथे केलेल्या भाषणात अजित पवारांनी, “ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये बसलो आहे,” असे वक्तव्य केले होते, असे जाधव यांनी सांगितले.

    या विधानानंतर काही नेते व मंत्र्यांकडून अजित पवारांना अप्रत्यक्षपणे इशारे देण्यात आले, असा दावा जाधव यांनी केला. “तुमची फाईल अजून निकाली निघालेली नाही, तुमची केस कोर्टात आहे, तोंडाला लगाम लावा,” अशा प्रकारचे संदेश त्यांना देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

    तसेच 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी पुन्हा एकदा, “भाजपच्या मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आली आहे,” असे वक्तव्य केले होते, असेही जाधव यांनी नमूद केले. या सर्व घटनांनंतर काही दिवसांतच त्यांचा अपघात होणे हा केवळ योगायोग आहे की षडयंत्र, याबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    या प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत निवेदन झालेले नाही, अशी टीकाही जाधव यांनी केली. त्यांनी म्हटले की, “या घटनेबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणले पाहिजे.” तसेच देशाचे पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकरणावर कोणतेही विधान केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी संशयास्पद असल्याची भावना अधिकच बळकट होत असल्याचे सांगत जाधव यांनी “दाल में कुछ तो काला है,” असे म्हणत सरकारवर सवाल उपस्थित केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026

    बारामती-राहुरीत राजकीय हालचालींना वेग; पोटनिवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.