Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला; दोन वाहनांसह जनावरे जप्त !
    क्राईम

    कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला; दोन वाहनांसह जनावरे जप्त !

    editor deskBy editor deskMarch 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    कत्तलीसाठी निर्दयतेने छोट्या मालवाहतूक वाहनांमध्ये कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या कारवाईत चाळीसगाव शहर पोलिसांनी दोन वाहनांसह सात गोवंश जप्त केले असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मार्च रोजी सकाळी सुमारे १०.२८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-भडगाव रोडवरील पातोंडा रोड परिसरातील दौलत हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी (क्र. एमएच ५४-०३११) ही गाडी संशयास्पदरीत्या जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी वाहन अडवून पाहणी केली असता, त्यामध्ये सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार गोवंश जातीचे गोहे दोरीने निर्दयतेने बांधून कोंबून ठेवलेले आढळून आले. ही जनावरे कत्तलीसाठी विनापरवाना नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

    दरम्यान, याचप्रमाणे दुसरी घटना दि. १० मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास चाळीसगाव-जामडी रोडवरील वाघडू गावातील बसस्टँड परिसरात उघडकीस आली. येथे टाटा एस कंपनीची मालवाहतूक गाडी (क्र. एमएच १९-६७२३) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जातीचे बैल दोरीने बांधून कोंबून ठेवलेले आढळले. ही जनावरे देखील कत्तलीसाठी विनापरवाना नेली जात असल्याचे समोर आले.

    दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे ५ लाख रुपये किमतीची दोन वाहने आणि १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा सात गोवंश असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026

    वरणगावात शस्त्रासह संशयित ताब्यात; पोलिसांची धडक मोहीम

    March 16, 2026

    किरकोळ वादातून राडा : बँक सेल्स ऑफिसरवर कड्याने हल्ला !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.