Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किरकोळ वादातून राडा : बँक सेल्स ऑफिसरवर कड्याने हल्ला !
    क्राईम

    किरकोळ वादातून राडा : बँक सेल्स ऑफिसरवर कड्याने हल्ला !

    editor deskBy editor deskMarch 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन मयुर रामसिंग दहीयेकर (वय २५, रा. कंजरवाडा) या बँक सेल्स ऑफिसरला दोघांनी हातातील कड्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १३ मार्च रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरातील दर्गाजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महिंद्रा कोटक बँकेत सेल्स ऑफिसर असलेले मयुर दहियेकर हे दि. १३ मार्च रोजी रात्री गेंदालाल मिल परिसरातील दर्गा परिसरातून जात होते यावेळी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन संशयित तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत हातातील कड्याने त्यांच्या तोंडावर बुक्का मारुन गंभीर जखमी केले. तसेच सेल्स ऑफिसर सोबत असलेल्या सहकारी मैत्रीणीला देखील मारहाण करण्यात आली असून ती जखमी झाली आहे. दरम्यान, दि. १४ मार्च रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026

    वरणगावात शस्त्रासह संशयित ताब्यात; पोलिसांची धडक मोहीम

    March 16, 2026

    कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला; दोन वाहनांसह जनावरे जप्त !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.