Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !
    क्राईम

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    editor deskBy editor deskMarch 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वडिलांना मारहाण केल्याच्या संतापातून तिघांवर गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना शहरातील वाल्मिक नगर परिसरातील घरकुल चौकात मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित अनिल रसाल राठोड (रा. श्रीराम चौक, वाल्मिक नगर) याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांना मारहाण केली होती. या घटनेची माहिती मुलगा अनिल राठोड याला मिळाल्यानंतर तो संतापाच्या भरात घरातून बाहेर पडला.

    दरम्यान, वडिलांना मारहाण करणारे तिघे जण वाल्मिक नगरातील घरकुल चौकात बसलेले असल्याचे अनिल राठोड याला दिसले. त्याने दुचाकी वळवून त्यांच्याकडे जात कमरेला लावलेल्या गावठी कट्ट्यातून त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे व नवजीत चौधरी यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेतला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अनिल राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. या घटनेप्रकरणी पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत असून शहरात पुन्हा एकदा गावठी कट्ट्याच्या वापरामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    March 15, 2026

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    March 15, 2026

    धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले : वढोदा जवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.