Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !
    क्राईम

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    editor deskBy editor deskMarch 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरातील घाटरोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार,  जहागीरदार वाडी येथील रेहान खान मंजूर खान (वय १९) या तरुणाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १५ फेब्रुवारीला दुपारी सुमारे १२.४० वाजता रेहान खान हा घाटरोड पोलीस चौकीच्या पाठीमागील गल्लीतून जात असताना जुन्या वादावरून मुफीद रेहमान मुजावर याने लोखंडी रॉडने तर मोहसीन मुजावर याने बांबूने त्याच्यावर पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात रेहान खान याच्या उजव्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे.

    दरम्यान, रेहानच्या वडिलांनाही मुफीद मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेनंतर रेहान खान बेशुद्ध पडल्याने मजहर खान मन्सूर खान व हसन खान मेहमुद खान यांनी त्याला खासगी वाहनातून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पीडित तरुणाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुफीद रेहमान मुजावर, मोहसीन मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख (सर्व रा. बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.